अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या हाती लागला.
मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होते. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या आहेत.
दीड महिन्यांपूर्वी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारावर विविध सहा पथकांनी हैद्राबादमधील कुख्यात बिलालनगर भागातील लॉजमधून पत्रकार बाळ बोठे यास शनिवारी पहाटे सहा वाजता ताब्यात घेण्यात आल्याची माहीती पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बोठे यास मदत करणाऱ्या नगरमधील एकास ताब्यात घेण्यात आले असून हैद्राबादमध्ये बोठे यास आश्रय देणारा वकील जनार्दन आकले व आणखी तिघांनाही हैद्राबाद येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, बोठे यास मदत करणारांची संख्या वाढणार असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|