मशिदीवरील भोंगे काढण्याची भूमिका बाळासाहेबांनी घेतलेलीच नाही, त्यांची कॉपी राज ठाकरे कधीच करू शकत नाहीत

Published on -

मुंबई : राज्यातील राजकारणात मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.

राज ठाकरे यांनी निर्धार केला आहे की, मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत जोपर्यंत सरकार कारवाई करत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या (Of the Supreme Court) आदेशानुसार या समस्येकडे लक्ष देत नाही तोपर्यंत मशिदीबाहेर हनुमान चालिसा लावणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

याबाबत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. याच मुद्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

याच मुद्यावरून आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athvale) यांनी माध्यमांशी बोलताना राज यांच्यावर निशाणा साधत बाळासाहेबांची कॉपी राज ठाकरे हे कधीच करू शकत नाहीत, अशी टीका केली आहे.

रामदास आठवले म्हणाले, ’बाळासाहेबांची कॉपी राज ठाकरे हे कधीच करू शकत नाहीत. बाळासाहेब हे फार वेगळं नेतृत्व होतं. ’ते पुढे म्हणाले, ’मशिदीवरील भोंगे काढा अशी भूमिका कधी बाळासाहेबांनी घेतलेली नाहीच. आणि त्यांनी नेहमीच मुस्लिम समाजाला पाठिंबा दिला होता.

बाळासाहेबांचा फक्त दहशतवादी मुस्लिमांना नेहमीच विरोध होता. त्यामुळे बाळासाहेबांची कॉपी करणं एवढं सोप्प काम नसून राज ठाकरे कधीच बाळासाहेबांना कॉपी करू शकत नाही.’ असे म्हणत आठवले यांनी राज ठाकरेंना सुनावले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News