अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदे तालुक्यात शेतकऱ्यांची वीज बिले थकीत असल्याचे कारण देऊन कार्यकारी अभियंता यांनी तोंडी आदेश देत थेट ट्रान्सफार्मर बंद करण्याची कारवाई सध्या वीज कंपनीकडून सुरु आहे.
शेतकऱ्यांची वीजतोड थांबवा अन्यथा कंपन्यांचा वीज पुरवठा तोडण्याचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.
तालुक्यात विजेसंदर्भात शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी असून विद्युत प्रवाह कमी दाबाने असणे, वारंवार विद्युत प्रवाह खंडित होणे. तसेच अचानक सिंगल फेज लाईट आल्यास विद्युत मोटारी जळण्याचे प्रमाण वाढत आहे.
त्यातच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तोंडी आदेश देत शेतकऱ्यांची वीजबिले थकीत असल्याचे कारण देऊन थेट ट्रान्सफार्मर बंद करण्याची कारवाई वीज कंपनीकडून सुरु आहे.
शेतकऱ्यांची वीजतोड थांबवावी अन्यथा श्रीगोंदे तालुक्यातील सर्व औद्योगिक कंपन्यांचा वीज पुरवठा बंद करण्याचे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे नाहाटा यांनी म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम