शेतीच्या पाण्यासाठी बळीराजा आक्रमक; जलसंपदा मंत्र्यांच्या घरमोसर आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-कुकडीचे आवर्तन २५ एप्रिलला सोडावे, या प्रमुख मागणीसाठी कुकडी पाटपाणी कृती समितीच्या वतीने राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील घरासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे आवर्तन सुटेल, असे आश्वासन पाटील यांचे मुख्य सचिव बाळासाहेब देशमुख यांनी दिले. यावेळी कुकडी पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के, मारुती भापकर, भूषण बडवे आदी उपस्थिती होते.

पुणे येथील कुकडी सिंचन भवनात कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्या उपस्थितीत दुसरी बैठक झाली.

कालवा सल्लागार समितीच्या सदस्यांनी ९ एप्रिलला घेतलेली बैठक ही २५ मार्चला घेऊन त्याच दिवशी पिंपळगाव जोगेचे आवर्तन सोडले असते, तर २५ एप्रिलपासून आवर्तन सोडता आले असते.

मात्र, केवळ कालवा सल्लागार समिती सदस्यांच्या हलगर्जीपणामुळे कुकडीचे आवर्तन एक महिना लांबणीवर पडले. यामुळे शेतकऱ्यांची पिके जळून खाक होणार आहेत. याला कालवा सल्लागार समितीचे सदस्य जबाबदार आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe