अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-सध्या जिल्ह्यात ग्रामीण भागात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असून हे चोरटे शेतकऱ्यांच्या विहिरीतील इलेक्ट्रिक मोटारी चोरुन नेत आहेत.
यामुळे मात्र शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. काल एकाच दिवशी जिल्ह्यातील पारनेर, नेवासा व श्रीगोंदा या ठिकाणी चार मोटारी व एक डिझेल इंजिन चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/10/chor-2-1-800x435-1.jpg)
यातील पहिली घटना नेवासा तालुक्यातील सोनई येथे घडली आहे. यात तैयब साहेबलाल इनामदार यांची खडलेपरमानंद शिवारात शेत आहे. या ठिकाणी त्यांच्या मालकीच्या विहिरीत तीन हॉर्स पॉवरच्या दोन इलेक्ट्रिक मोटारी व काळ्या रंगाची केबल चोरून नेली आहे.
दुसरी घटना पारनेर तालुक्यातील पानोली गावात घडली आहे. यात स्वाती भारत गायकवाड यांच्या मालकीच्या विहिरीतुन अज्ञात चोरट्यांनी पाच हॉर्स पॉवरची मोटार व स्टार्टर अज्ञात चोरांनी लंपास केली आहे.
याबाबत गायकवाड यांनी पारनेर पोलिसात फिर्याद दिली आहे. तिसरी घटना श्रीगोंदा तालुक्यातील बंगारडा येथे घडली आहे. यात पोपट तुकाराम गायकवाड यांच्या मालकीच्या विहिरीतून तीन हॉर्स पावरची इलेक्ट्रिक मोटार व केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे.
याबाबत गायकवाड यांनी श्रीगोंदा पोलिसात फिर्याद दिली आहे. चौथी घटना नेवासा तालुक्यातील गोगलगाव येथे घडली आहे.
यात चोरट्यांनी सतीश प्रेमराज चुत्तर यांचे पाच हॉर्स पॉवरचे डिझेल इंजिन चोरून नेले आहे. याप्रकरणी चुत्तर यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधात नेवासा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या घटनांमुळे शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत..
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|