Bank Holidays in October : लवकरच ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे. या महिन्यात जर तुमचे बँकेत काही काम असेल तर जरा इकडे लक्ष द्या. कारण पुढच्या महिन्यात बँकांना 16 दिवस सुट्टी असणार आहे. तुम्हाला सुट्ट्यांची यादी माहित नसेल तर तुमची आर्थिक कामे होणार नाहीत.
समजा जर तुम्हाला पुढच्या महिन्यात शाखेत जाऊन बँकेचे कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास तुम्ही घर सोडण्यापूर्वी आरबीआयचे हॉलिडे कॅलेंडर नक्कीच तपासावे. कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये गांधी जयंती, दुर्गा पूजा, नवरात्री, महालय, काटी बिहू, दसरा, लक्ष्मीपूजा, सरदार वल्लभभाई पटेल जयंती यामुळे देशातील वेगवेगळ्या भागातील 16 दिवस बँका बंद राहणार आहेत.
2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे. यानंतर देशात पुन्हा एकदा सणासुदीला सुरुवात होईल. या महिन्यात दुर्गापूजा, नवरात्री, दसरा असे अनेक सण येतात. या सणांमुळे, बँका ऑक्टोबरमध्ये 16 दिवस बंद राहतील.
हे लक्षात घ्या या सुट्यांमध्ये चारही रविवार, दुसरा आणि चौथा शनिवारचा समावेश आहे. या महिन्यात साप्ताहिक सुट्ट्यांमुळे 6 दिवस आणि सणांमुळे 10 दिवस बँका बंद राहतील तुम्ही RBI च्या अधिकृत वेबसाइट https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx लिंकवर क्लिक करून सुट्ट्यांची यादी तपासू शकता. जाणून घेऊयात सुट्ट्यांची संपूर्ण यादी.
2 ऑक्टोबर 2023 (सोमवार)- गांधी जयंती
14 ऑक्टोबर 2023 (शनिवार) – महालय-कोलकाता येथे बँका बंद असतील.
ऑक्टोबर 18: 2023 (बुधवार) – काटी बिहू – आसाममध्ये बँका बंद असतील.
21 ऑक्टोबर 2023 (शनिवार) – दुर्गा पूजा (महा सप्तमी) – पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम आणि मणिपूरमध्ये बँका बंद असतील.
23 ऑक्टोबर 2023 (सोमवार) – महानवमी, आयुधा पूजा, दुर्गा पूजा – बिहार, झारखंड, कर्नाटक, ओडिसा,आसाम, त्रिपुरा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये बँका बंद असतील.
24 ऑक्टोबर 2023 (मंगळवार) – दसरा म्हणजेच विजयादशमी, दुर्गा पूजा – आंध्र प्रदेश, मणिपूर वगळता सर्व राज्यांमध्ये बँका बंद असतील.
25 ऑक्टोबर 2023 (बुधवार) – दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद असतील.
26 ऑक्टोबर 2023 (गुरुवार) – दुर्गा पूजा (दसैन) / विलीनीकरण दिवस – जम्मू आणि काश्मीर आणि सिक्कीममध्ये बँका बंद असतील.
27 ऑक्टोबर 2023 (शुक्रवार) – दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद असतील.
28 ऑक्टोबर 2023 (शनिवार) – लक्ष्मी पूजा – पश्चिम बंगालमध्ये बँका बंद असतील.
31 ऑक्टोबर 2023 (मंगळवार) – सरदार वल्लभभाई पटेल जयंती – गुजरातमध्ये बँका बंद असतील.