Banking Update:- स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील एक महत्त्वपूर्ण बँक असून भारतामध्ये सगळ्यात जास्त ग्राहक या बँकेचे आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया ही ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या सोयीसुविधा सातत्याने उपलब्ध करून देत असते व ग्राहकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून देखील अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेत असते.
ग्राहकांना कुठल्याही प्रकारच्या समस्या बँकेच्या सेवेसंबंधित निर्माण होऊ नये यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया कायम सजग असते. आताचा कालावधी पाहिला तर तो यूपीआयच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याचा कालावधी आहे व आता यूपीआयच्या माध्यमातून ट्रांजेक्शन करण्याला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जात आहे.
परंतु असे असताना देखील बऱ्याचदा आपल्याला प्रवासाच्या निमित्ताने किंवा कुठे बाहेर जावे लागत असताना रोख पैशांची गरज भासते. अशा वेळी आपण आपल्या खिशातील एटीएम कार्डचा वापर करतो. परंतु बऱ्याचदा जर एटीएम कार्ड सोबत नसले तर खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकते. याचा अनुषंगाने आता स्टेट बँक ऑफ इंडियाने बँकेच्या योनो ॲपच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून आता बँकेच्या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी एटीएम कार्डची गरज भासणार नाही.
एसबीआयच्या ग्राहकांना आता पैसे काढण्यासाठी एटीएम कार्डची गरज नाही
एटीएम कार्ड घरी राहिले किंवा हरवल्यास रोख पैशांची चणचण किंवा काही समस्या ग्राहकांना निर्माण होऊ नये याकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आता बँकेचे युनो हे ॲप यूपीआयशी लिंक करण्यात आलेले आहे. या अँपच्या माध्यमातून आता क्रेडिट कार्ड शिवाय देखील तुम्ही एटीएम मधून सहज पैसे काढू शकणार आहात. या फिचरला इंटरपेयेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल असे नाव देखील देण्यात आलेले आहे. ही सुविधा आता सर्व एटीएम वर उपलब्ध आहे. याबाबत बँकेने म्हटले आहे की एटीएम कार्डच्या क्लोनिंगमुळे जी काही फसवणूक होते त्यावर नियंत्रण मिळवता येणे आता शक्य होणार आहे.
एटीएम कार्ड शिवाय तुम्ही अशा पद्धतीने काढू शकतात पैसे
याकरिता सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये योनो ॲप ओपन करावी लागेल व त्यानंतर तुम्हाला कॅश विथड्रॉवल हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला किती रक्कम काढायची आहे ती रक्कम भरावी लागेल. त्यानंतर तुम्ही तुमचे एटीएम निवडावे व एक क्यूआर कोड जनरेट होईल तो जनरेटर झालेला क्विआर कोड तुम्हाला स्कॅन करावा लागेल. तुमचा यूपीआय आयडी आणि यूपीआय पीन टाकून सबमिट पर्यायावर क्लिक करायचे आहे व त्यानंतर तुमच्या खात्यातून रोख रक्कम बाहेर येईल.
अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने एटीएम कार्डशिवाय देखील पैसे काढू शकता.