अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- पाईपलाइनवरून कोणीतरी गाडी घातल्याने घरासमोर येऊन शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या दरम्यान डोक्यात लोखंडी फावडे मारून पाच जणांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी झालेल्या मारामारीत घरातील एकुण पाचजण जबर जखमी झाले आहेत. ही घटना नेवासा तालुक्यातील माळी चिंचोरा येथे घडली. याबाबत भाग्यश्री विशाल काळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पती पत्नी व मुला विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/01/5271-crime-2-1.jpg)
याबाबत सविस्तर असे की, नेवासा तालुक्यातील माळी चिंचोरा येथील दत्तात्रय रंगनाथ बोरुडे,आशाबाई दत्तात्रय बोरुडे व संकेत दत्तात्रय बोरुडे यांच्या पाईपलाइनवरून कोणीतरी गाडी घातल्याने दत्तात्रय बोरुडे यांनी फिर्यादी यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करून निखील बोरुडे यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी आरडाओरडा ऐकून आशाबाई बोरुडे व संकेत बोरुडे हे दोघे आले संकेत याने त्याच्या हातातील लोखंडी फावडे निखील याच्या डोक्यात मारून जखमी केले. यावेळी त्यांना समजून सांगण्यासाठी मीरा बोरुडे ही गेली असता दत्तात्रय बोरुडे याने दुसरे लोखंडी फावडे आणून तिला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले.
यावेळी आशाबाई बोरुडे हिने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दत्तात्रय बोरुडे याने फिर्यादीचे सासरे रमेश बोरुडे यांच्या छातीवर फावडे मारून जबर जखमी केले आहे. फिर्यादीचे पती विशाल भांडणे सोडवण्यासाठी आले असता त्यालाही आशाबाई व संकेत याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यात भाग्यश्री विशाल काळे,निखील बोरुडे,रमेश बोरुडे,मीरा बोरुडे,विशाल बोरुडे हे जखमी झाले आहेत. तर दत्तात्रय रंगनाथ बोरुडे,आशाबाई दत्तात्रय बोरुडे व संकेत दत्तात्रय बोरुडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक तपास पोसई दाते हे करत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|