आरक्षणाची लढाई… उद्या राज्यभरात चक्काजाम आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- सध्या राज्यात आरक्षणाची लढाई सुरु आहे. आरक्षणासाठी समाजबांधव एकत्र येऊन आंदोलनाचा लढा उभारू लागले आहे.

यामाध्यमातून सरकारला जाग यावी या उद्देशाने आंदोलनाचा पवित्रा हाती घेण्यात येऊ लागला आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणासाठी भाजपने एल्गार पुकारलेला असतानाच आता भाजपचा मित्र पक्ष असलेला रासपही ओबीसींसाठी मैदानात उतरणार आहे.

रासप नेते महादेव जानकर यांनी उद्या रविवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत बोलताना जानकर म्हणाले कि, ओबीसी आरक्षणासाठी उद्या म्हणजेच रविवार रोजी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल.

राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करतील. ओबीसींना लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असून आंदोलनाद्वारे या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं जानकर यांनी सांगितलं.

आरक्षणाच्या लढाईसाठी भाजपाही मैदानात :- ओबीसींचं आरक्षण राज्य सरकारमुळे गेलं. सरकारचा नाकर्तेपणा आता जनतेसमोर आलाय. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहे.

जो पर्यंत महाराष्ट्र सरकार डाटा गोळा करणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe