अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- पारनेर तालुक्यात या आधी बिबट्या व तरसाने धुमाकूळ घालत नागरिकांना जेरीस आनले होते. त्यातून कुठे सावरत नाहीत तोच परत पट्टेरी वाघाचेही तालुक्यात आगमन झाले आहे.
तालुक्यातील म्हस्केवाडी येथे पट्टेरी वाघाचेही दर्शन झाल्याने तालुक्यात या वाघाची दहशत निर्माण झाली आहे. तालुक्यात यापूर्वी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात नागरिकांसह अनेक पाळीव प्राणी मृत्युमुखी पडले तर अनेक जखमी झालेले आहेत.

बिबट्यापाठोपाठ तरसाने देखील एका नागरिकाचा बळी घेतला आहे. ही घटना ताजी असतानाच आता कुकडी कालवा परिसरात पट्टेरी वाघ दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
दरम्यान पट्टेरी वाघाचे दर्शन या आधीही तालुक्यात झाले होते परंतु वनविभागाने या भागात बिबट्याअसून पटेरी वाघ नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली होती
मात्र आता कुकडी डावा कालव्याच्या परिसरात पट्टेदार वाघ फिरत असल्याचे एका युवकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने त्याचा व्हिडीओ काढून तो सोशल मिडियावर व्हारयल केला आहे.
यापूर्वीही अनेक दिवसांपासून पट्टेदार वाघाचे या परिसरात दर्शन होत असून नागरीक त्यामुळे भयभित आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम