अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोरोना काळात अनेक ठिकणी रुग्णालयाने दिलेल्या मोठमोठ्या रकमेच्या बिलामुळे रुग्णाचे नातेवाईक व रुग्णालय प्रशासन यांच्यात वादाचे प्रसंग घडले आहेत. यात अनेक वेळा रुग्ण दगावून सुद्धा मोठ्या रकमेची बिले देऊन ती वसुली वरून वाद होतात.
असाच प्रसंग सांगली येथे घडला आहे. येथे बिलाच्या कारणावरुनच डॉक्टरांना दमदाटी करुन त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच शिवीगाळ करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी डॉ. संजय बबनराव लवटे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परशुराम दऱ्याप्पा गोयकर, श्रीकांत शिवाजी गोयकर आणि एक अनोळखी अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, परशुराम यांचे भाऊ रुग्णालयात ॲडमीट होते.
त्यांच्यावर उपचार सुरु असताना दि. १८ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दि. ८ जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास संशयित हे रुग्णालयात गेले.
त्यांनी रुग्णालयाचे जे बिल दिले आहे त्या बिलात एक हजार रुपये कशाचे जास्त लावले आहेत असे म्हणून तेथे असलेल्या डॉ. लवटे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या अंगावरील पीपीई कीट फाडून टाकले. शिवीगाळ करुन दमदाटी केली. व जीवे मारण्याची धमकी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम