पुन्हा पोलिसांना मारहाण; नगर शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-कोरोनाच्या काळात नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र सेवा देणार्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला होत असल्याच्या घटना नगर जिल्ह्यात घडत आहे.

नुकतेच संगमनेर मध्ये पोलीस पथकावर झालेला हल्ल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ल झाल्याची घटना घडली आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यास कर्तव्य बजावत असताना मारहाण केल्याची घटना घडली आहे. अनिल पांडुरंग आव्हाड असे मारहाण झालेल्या पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी आव्हाड हे कोविड 19 विषाणू रोगाच्या अनुषंगाने बोल्हेगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांविरूद्ध कारवाई करत होते.

त्यावेळी आरोपी दादाभाऊ फ्रान्सीस वंजारे (वय 31, रा. वडगाव, गुप्ता, अहमदनगर) आणि कैलास साळवे हे दोघे दुचाकी वरून डबल सीट आले असता त्यांना आव्हाड यांनी दंड भरण्यास सांगितला.

दंड भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने आरोपी साळवे हा फिर्यादी आव्हाड यांना शिवीगाळ करून तेथून पळून गेला.

त्यानंतर आरोपी वंजारे याला दंड भरण्यास सांगितले असता वंजारे याने आव्हाड यांची गचांडी पकडून चापटीने मारहाण करून शिवीगाळ केली.

त्यानंतर पोलिसांनी आरोपी दादाभाऊ वंजारे याला लगेच ताब्यात घेतले तर आरोपी साळवेला अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe