अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- नागरिकांच्या संरक्षणासाठी अंगावर खाकी परिधान केलेल्या पोलिसावरच एकाने हल्ला केल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अप्पा बन्सी औटी (रा. लोंढे मळा, सोनेवाडी रोड, केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस कॉन्स्टेबल सतीश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/03/पोलिसाला-मारहाण.jpg)
शिंदे हे केडगाव भागात पेट्रोलिंग करत असताना त्या भागात असलेल्या औटी यांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देण्यासाठी ते त्यांच्या घरासमोर गेले.
‘मी नोटीस घेणार नाही, असे म्हणत त्याने आरडाओरड करत पोलिस कॉन्स्टेबल शिंदे यांच्या अंगावर हात टाकला. त्यानंतर शिंदेनी कोतवाली पोलीस ठाण्यात फोन करून सरकारी गाडी बोलावून घेतली.
औटी याला कोतवाली पोलीस ठाण्यात आणले. कॉन्स्टेबल शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|