सावधान! राज्यात झपाट्याने वाढत आहे ‘Conjunctivitis’; जाणून घ्या लक्षणे आणि…

Sonali Shelar
Published:
Conjunctivitis

Conjunctivitis : राज्यात झपाट्याने Conjunctivitis या आजाराची साथ पसरलेली आहे. याचे वाढते प्रमाण पाहून विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये याची प्रकरणे वाढत असून लोकं त्याबद्दल चिंतेत आहेत. म्हणूनच आजच्या या बातमीत आपण याबद्दल सर्वकाही जाणून घेणार आहोत. चला तर मग…

डोळे येणे म्हणजे काय?

डोळ्याच्या पापणी आड एक पारदर्शक पडदा असतो, ज्याला वैद्यकीय भाषेत conjunctiva असे म्हणतात, ह्या पडद्याला सुज येणे किंवा ते लाल होणे याला आपण डोळे येणे असे म्हणतो.

जर एखाद्या व्यक्तीला Conjunctivitis आजार असेल तर त्याच्या डोळ्यात पाहू नका किंवा त्याचा रुमाल, टॉवेल, मोबाईल किंवा त्याच्या इत्यादी वस्तुंना हात लावू नका.

डोळा येण्याची लक्षणे

डोळे लाल किंवा डोळ्यांना खाज येताच त्या व्यक्तीने डोळ्यांच्या डॉक्टरांना भेट देणे आवश्यक आहे. त्याच्या सामान्य लक्षणांमध्ये डोळे लाल होणे, खाज सुटणे, अश्रू येणे यांचा समावेश होतो. अशावेळी तुम्ही डॉक्टरांना भेट देणे गरजेचे आहे.

डोळा आल्यावर काय करावे ?

डोळ्यांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र, पावसाळ्यात डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी छोटी पावले उचलणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या डोळ्यांना वारंवार स्पर्श करणे टाळणे, विशेषतः जर तुमचे हात व्यवस्थित धुतले गेले नाहीत.

या दिवसांमध्ये आपण आपले डोळे स्वच्छ ठेवले पाहिजेत. तसेच आपण गॉगल घालणे आवश्यक आहे. यामुळे घरातील इतर सर्व सदस्यांनी याचा त्रास होणार नाही. तसेच या दिवसांमध्ये नियमितपणे हात धुतले गेले पाहिजेत. तसेच कुटुंबापासून लांब राहिले पाहिजे. जेणेकरून त्यांना याची साथ लागणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe