सावधान, मुलीला डोळा मारल्यास, अन् फ्लाईंग किस केल्यास एका वर्षाची शिक्षा….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- मुलीला डोळा मारणे आणि फ्लाईंग किस करणे हा लैंगिक छळ होतो. या गुन्ह्यात एका वर्षाची शिक्षा होऊ शकते.

अशा एका गुन्ह्यात मुंबई न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. २९ फेब्रुवारी २०२० रोजी १४ वर्षाच्या मुलीने तिच्या आईला सांगितले की, एका मुलाने तिला डोळा मारला तसेच फ्लाईंग किस केली.

यावरून पीडित मुलीच्या घरच्यांनी एलटी मार्ग पोलीस स्टेशनला लैंगिक छळ केल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी कारवाई करत ज्या तरूणाविरोधात ही तक्रार होती. त्याला अटक केली. तेव्हापासून ही तरूण पोलीस कोठडीत आहे.

या तरूणाने कोर्टात दावा केला की, मुलीच्या आईने मी वेगळ्या जातीचा असल्याने मुलीशी बोलण्यापासून रोखलं होतं.

तसेच तिच्या नातेवाईकांमध्ये तिने मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याबाबत चॅलेंज केले होते असा तरूणाने सांगितले. सुनावणीवेळी मुलगी, तिची आई आणि तपास अधिकारी यांची साक्ष ग्राह्य धरून गुन्हा सिद्ध करण्यात आला.

साक्षीदारांच्या जबाबानंतर तरूण दोषी आढळला. त्यावेळी कोर्ट म्हणाले, आरोपीविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे त्याला १ वर्षाची शिक्षा सुनावण्यात येत आहे.

तक्रारीनुसार डोळा मारणे आणि फ्लाईंग किस करणे हा लैंगिक इशारा आहे. त्यामुळे पीडित तरुणीचा लैंगिक छळ झाला आहे असं कोर्टाने सांगितले. ही शिक्षा प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेसेंस कायद्यातंर्गत सुनावण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe