अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-लॉकडाउनचा आदेश न जुमानता नगर शहरातील नागरिक नेहमी प्रमाणे विनाकारण रस्त्यावर फिरत होते. अशा नागरिकांना महापालिका व पोलिसांच्या पथकाने अडवले.
त्यांची जागेवरच रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली.यामध्ये दोघेजण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. पत्रकार चौक, जिल्हा पोलिस अधीक्षक चौक या दोन ठिकाणी या पथकाने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली.
यात जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय चौकात 67 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. यात दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यासह नगर शहरात कोरोनाचा धोका वाढला आहे. यामुळे हिंडफिऱ्या नागरिकांची तपासणी केली जावी अशी मागणी महापौरांकडे केली होती.
त्यानुसार आजपासून शहरातील इतरही ठिकाणी अशाच प्रकारे अचानकपणे येऊन हे पथक रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजेन चाचणी करणार आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांना तातडीने कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये, असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|