अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघामधील गायकरवाडी येथील आरोळे हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे.
त्या कोविड सेंटरमध्ये आज शेकडो रूग्णांवर उपचार केले जात आहे. त्या रूग्णालयात कोरोना रुग्णांसाठी म्युझिक थेरपीचा यशस्वी वापर केला.

गेल्या काही दिवसांमध्ये नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्येमध्ये चांगलीच घट झाली आहे, तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढते आहे.
यामुळे जिल्ह्यात काहीसे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. करोनाची ही दिलासादायक आकडेवारी सुधारण्यात डाॅक्टर आणि परिचारिका यांचा मोलाचा वाटा आहे.
या महामारीच्या काळात रुग्णासोबत डॉक्टर आणि नर्स यांना स्वःताहाचेही मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळणे तितकेच गरजेचे आहे.
त्यातच रुग्णांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी एका कोविड सेंटरमध्ये म्युझिक थेरपीचा वापर करण्यात आला आहे.
सध्या हा व्हिडियो सोशलवर व्हायरल होत असून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा हा व्हिडियो शेअर करत डॉक्टरांचे कौतुक केले आहे. हा व्हिडियो कर्जत-जामखेडमधील गायकरवाडी येथील आरोळे हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटरचा आहे.
आमदार रोहित पवारांचे ट्विट :- ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण…’या उक्तीनुसार आरोळे हॉस्पिटलच्या समन्वयक सुलताना शेख यांनी कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी ‘म्युझिक थेरपी’चा यशस्वी वापर केला आणि काही क्षण आजारपण विसरून अनेक रुग्णांची पावलंही झिंगाट गाण्यावर अशी थिरकली!
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम