अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- नगर मतदार संघातील विसापूर ते शिंदे मळा या रस्त्याचे आज उदघाटन करण्यात आले . मतदारसंघातील जनता हेच माझे दैवत अन त्यांच्या विकासासाठी आहोरात्र झगडत राहणार असून तालुक्याच्या विकासासाठी आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ.
असे मा.आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राहुलदादा जगताप यांनी याप्रसंगी सागितले. मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत 1 कोटी ८९ लाख 55 हजार रूपयांच्या प्रजिमा 56 – विसापूर ते शिंदेवाडी या रस्त्यांचे भुमीपुजन आज रविवारी कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक राहुलदादा जगताप पाटील यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी प्रत्यक्ष मंजूर कामांचे भुमीपुजन करतो, पोकळ आश्वासने देत नाही. लोकांची अडचणी समजून तालुक्याच्या विकासासाठी आघाडी सरकाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत आहे. कामाच्या बाबतीत काही अडचणी आल्यास जनतेचे माझ्याशी संपर्क साधावा.असे प्रतिपादन राहुलदादा जगताप पाटील यांनी केले.
या रस्त्याची तेथील ग्रामस्थांची अनेकदिवसा पासूनची मागणी होती. हा रस्ता मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरवात केली म्हणून सर्व ग्रामस्थांनी राहुलदादा जगताप यांचे आभार मानले. या भुमीपुजन शुभारंभाचे वेळेस विसापूरचे ग्रामस्थ,
सरपंच श्री. अरविंद जठार, कुकडी कारखान्याचे संचालक धनाजी शिंदे, उपसरपंच खंडेराव जठार, मा.संचालक विष्णु जठार, सचिन जठार, मा.चेअरमन बाळासाहेब शिंदे, मा.उपसरपंच भाऊसाहेब शिंदे, शाम जठार, दानेश सय्यद, चेअरमन-आप्पा गोविंद शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष-शशिकांत गटणे ,
चेअरमन मुंगुसगाव-भाऊसाहेब इथापे, अनिल कानगुडे,विलास लगड, शहाजी लगड, मच्छिंद्र जठार, सुखदेव शिंदे, दिलीप उदार, संपत उदार, चेअरमन चांभूर्डी खंडेराव नाईक, सुरेश जठार, नाथाभाउ शिंदे,सरपंच सारोळा सोमवंशी-बंडू आढाव मिठू जठार, लालासाहेब शिंदे, सुनिल जगताप, बंडू जठार, सतिष जठार, इ. उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम