बिग ब्रेकिंग : आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वर असलेला मोठा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले. बैठक सुरु असतानाच बाहेर स्लॅब कोसळल्याची घटना घडली.

सह्याद्री अतिथीगृहातील हॉल क्रमांक ४ बाहेरील स्लॅब अचानक कोसळल्याने सह्याद्री अतिथीगृहात एकच खळबळ उडाली. ही घटना घडताच सर्वांची धावपळ झाली. या दुर्घटनेतून सर्वजण सुखरुप बाहेर पडल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि आज संध्याकाळी ४.४५ वाजता सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या विभागाच्या प्रशासकिय अधिकार्यांच्या बैठका सह्याद्री अतिथीगृहात घेत होते. त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरच शोभेचे मोठे झुंबर त्यावरील पीओपी स्लँबसह कोसळले.

अचानक झालेल्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र दुर्घटना जीवघेणी होती. त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व अधिकार्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले.

हे बांधकाम 20 ते 25 वर्षांपूर्वीचे आहे. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक व्हीआयपींची येथे नेहमीच वर्दळ असते. तेथे असा प्रकार घडल्याने यंत्रणांची पळापळ झाली आहे. या सर्व इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेलं आहे.

त्या संपूर्ण इमारतीचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतरच याबाबत प्रतिक्रिया देण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, संबंधित दुरुस्तीचं काम तातडीनं सुरू करण्यात आलं आहे. हा अपघात बैठक सुरू असलेल्या सबागृहाच्या बाहेरच झाला. त्यामुळं या अपघाताच्या आधी नंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आणि सर्व अधिकार्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe