बिग ब्रेकिंग : रेखा जरे हत्येप्रकरणी दोषारोपपत्र दाखल, मात्र बाळ बोठे…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करणा-या पाच आरोपींविरोधात तपासी अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी अजित पाटील यांनी तब्बल १ हजार ५०० पानांचे चार्जशिट (दोषारोपपत्र) (रेग्युलर क्रिमिनल केस क्र. १४८/२०२१) पारनेर न्यायालयात सादर केल्याचे वकील संकेत ठाणगे यांनी सांगितले.

जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ बोठे अद्यापही फरार असल्याने त्याच्याविरोधात तो अटक करण्यात आल्यानंतर स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र (चार्जशीट) सादर करण्यात येणार आहे.

ज्ञानेश्वर उर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर),फिरोज राजू शेख (राहूरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) या आरोपींविरोधात शुक्रवारी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे वकील संकेत ठाणगे यांनी सांगितले.

३० नाहेंबर रोजी नगर पुणे महामार्गावर जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून निर्घुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जरे यांच्या आईने फिर्याद दाखल केल्यानंतर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जरे यांच्यावर हल्ला करणा-या दोघांपैकी एकाचा फोटा जरे यांच्या मुलाने काढला होता. याच फोटोवरून पोलिसांनी दोघाही आरोपींना तात्काळ जेरबंद केले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहीतीनुसार आणखी तिघांना अटक करण्यात आली.

त्यांची कसून चौकशी करण्यात आली असता बाळ बोठे हा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार असल्याची माहीती पुढे आली. सागर भिंगारदिवे मार्फत त्याने जरे यांच्या हत्येेची सुपारी दिली होती.

त्यानंतर मोबाईल सीडीआरवरून रेखा जरे यांच्या हत्येचा बोठे हाच सुत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते.पाच आरोपी अटक करण्यात आल्यानंतर मुख्य आरोपी बोठे हा आजूनही फरारच आहे. 

त्याचा सत्र न्यायालय, उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. आता त्याने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe