अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :- जिह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे रोज मोठ्या संख्येने बाधित रुग्ण वाढत आहेत.
एकीकडे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन तारेवरची कसरत करत असताना परत हे संकट उभे ठाकल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील शेळकेवाडी परिसरात शनिवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
पठार भागातील गावांमध्ये मागील महिन्यातच भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला होता. नाशिकच्या मेरी या संस्थेच्या भुकंपमापक यंत्रावरही या धक्क्याची नोंद झाली होती.
रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास बोटा परिसरातील शेळकेवाडी येथे भूकंपाचे धक्के काही वेळ जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|