अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणोशोत्सव देखील निर्बंधात साजरा करावा लागणार आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यंदाचा गणोशोत्सव देखील साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. शासनाने दिलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांवर गणोशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक मर्यादा आल्या आहेत.

file photo
सार्वजनिक गणेशोत्सव २०२१च्या मार्गदर्शक सूचना जाणून घ्या गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना
- गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित.
- कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.
- सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी *विसर्जन कृञिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी.
- नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी.
- शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.
- सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत
- आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी.
- नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.
- गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी
गणेशोत्सवाच्या काळात शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
सरकारच्या या नवीन मार्गदर्शक सूचनांनंतर प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या काळात आणखी काही सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम