अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजही राज्यात पाच जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यांतील पाच जिल्ह्यांत मान्सूनची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून राज्यात मान्सूननं दडी मारली आहे.
परंतु विकेंडनंतर राज्यात चांगल्या पावसाची अपेक्षा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आजपासून पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान,३०-४० किमी प्रतितास वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होणार आहे.
सध्या बिहार आणि आसपासच्या परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम