अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- नगर अर्बन बँकेवर भारतीय रिझर्व बँकेने पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले असून ठेवीदारांना दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.
त्याच पद्धतीने बँकेच्या संचालक मंडळाला कोणतेही नवीन कर्ज मंजुरी, ऍडव्हान्स, गुंतवणूक करण्यासाठी बंधने आणली असून यासाठी रिझर्व बँकेची परवानगी घेणे गरजेचे असणार आहे.

बँकेची येणाऱ्या काळात आर्थिक प्रगती पाहून याबाबत पुढील निर्णय आरबीआय घेणार आहे. हा निर्णय आज सहा डिसेंबर पासून पुढील सहा महिन्यासाठी लागू असणार आहे.
मात्र एकूणच बँकेची येणाऱ्या काळात असणारी आर्थिक परिस्थिती आणि प्रगती पाहून आरबीआय पुढील निर्णय घेऊ शकते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम