बिग ब्रेकिंग : श्री साईबाबा मंदिर बंद ! ‘त्यांनी’ येऊ नये; संस्थानचे आवाहन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  देशातील व राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्‍या कोवीड-१९ संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार ५ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता बंद ठेवण्‍यात आले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी दिनांक २२ जुलै ते २४ जुलै २०२१ या कालावधीत येत असलेल्‍या श्रीगुरुपौर्णिमा उत्‍सवानिमित्‍त पालखी घेऊन पदयात्रींनी शिर्डी येथे येण्‍याचे टाळावे, असे आवाहन संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी केले.

बगाटे म्‍हणाले, श्री क्षेत्र शिर्डी हे देशातील नामांकित देवस्‍थान असून श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता देशाच्‍या व जगाच्‍या काना कोपऱ्यातून भक्‍त दर्शनाकरीता शिर्डी येथे येत असतात.

श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने दरवर्षी श्रीरामनवमी, श्रीगुरुपौर्णिमा, श्रीपुण्‍यतिथी आदी प्रमुख उत्‍सवांचे आयोजन करण्‍यात येते.

पालखीसह येणारे पदयात्री या उत्‍सवांचे प्रमुख्‍य वैशिष्‍टये असते. त्‍यामुळे राज्‍यासह देशाच्‍या कानाकोपऱ्यातून पालखीसह येणाऱ्या पदयात्रींची संख्‍या मोठयाप्रमाणात असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe