अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- ‘अंडरवर्ल्ड डॉन’ अशी ओळख असलेला कुख्यात गँगस्टर छोटा राजन उर्फ राजेंद्र निकाळजे याचा शुक्रवारी दिल्लीत उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
छोटा राजन करोना संक्रमित असल्याचं समोर आल्यानंतर त्याला उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. इथेच त्यानं अखेरचा श्वास घेतला.
तब्बल 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जानेवारी महिन्यात ही शिक्षा सुनावली होती.
छोटा राजन ऊर्फ नाना, याचं खरं नाव राजन सदाशिव निखलजे असं आहे. तो सुरुवातीला अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्ब हल्ल्याचा आरोपी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार होता.
मात्र, कालांतराने दोघांमध्ये टोकाचं शत्रूत्व निर्माण झालं. छोटा राजनने मुंबईतील एका चित्रपटगृहाबाहेर ब्लॅक तिकीट विकण्याचं काम सुरु केलं.
त्यानंतर त्याची भेट राजन नायर ऊर्फ बडा राजन याच्याशी भेट झाली. बडा राजनकडून त्याने चुकीच्या आणि गुन्हेगारीच्या अनेक गोष्टी शिकल्या.
येथूनच त्याच्या गुन्हेगारी विश्वातील कट-कारस्थानाला सुरुवात झाली. तो दारुची तस्करी करु लागला. बडा राजनच्या मृत्यूनंतर गुन्हेगारी विश्वात तो छोटा राजन म्हणून नावरुपाला आला.
त्याच्यावर खंडनी, हत्येची, तस्करीचे अनेक मोठमोठे आरोप आहेत.छोटा राजन विरोधात 17 हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हेल दाखल आहेत. तो कित्येक वर्षांपासून फरार होता. मात्र, 2015 साली त्याला इंडोनेशियातून अटक करण्यात आली होती.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|