शिर्डीकरावर मोठे संकट; कोरोनाच्या संकट काळात डॉक्टर….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव पसरला आहे. यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये या व्हायरसची भीती पसरली आहे. कोरोनाकाळात डॉक्टर हे खरे देवदूत ठरले.

मात्र आता हेच देवदूत आपल्या काही प्रलंबित मागण्यासाठी आंदोलनाच्या भूमिकेवर उतरले आहे. यामुळे शिर्डीतील नागरिकांवर मोठे संकट ओढवले आहे.

गेल्या वर्षभरापासून बंद करण्यात आलेला प्रोत्साहन भत्ता पुर्ववत सुरू करावा या मागणीसाठी साईबाबा रूग्णालयातील स्पेशालीटी डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी कॅज्युअल्टी व इमर्जन्सी रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे.

प्रशासनाने तरीही याकडे लक्ष दिले नाही तर रूग्णांची गैरसोय होवू नये म्हणून अन्य रुग्णांची बाहेर तपासणी करण्याचा निर्णयही डॉक्टरांनी घेतला आहे. विविध विषयातील तज्ञ असलेले अनेक डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

या रूग्णालयातील डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. मात्र कोवीडच्या पार्श्वभूमीवर गेल्या एप्रील महिन्यापासुन हा भत्ता बंद करण्यात आलेला आहे.

मंदीर उघडल्यानंतर पुन्हा भत्ता सुरू करण्याचे आश्वासन डॉक्टरांना देण्यात आले होते. मात्र मंदीर उघडून चार महिने उलटूनही हा भत्ता अद्याप सुरू झालेला नाही.

कोरोना काळात सगळीकडे डॉक्टरांचे पगार वाढवण्यात आले संस्थान रूग्णालयातील डॉक्टरांनी कोवीड व नॉनकोवीड रूग्णालयात अहोरात्र काम करूनही त्यांचे पगार कमी करण्यात आले. किमान आता तरी प्रोत्साहन भक्ता सुरू करावा अशी या डॉक्टरांची मागणी आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe