पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय… ‘या’ विद्यार्थ्यांची 100 टक्के फी माफ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- राज्यासह देशात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाची लाट कायम आहे. यातच कोरोनाची दुसरी लाट मोठी विघातक ठरली होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या कुटुंबातील प्रिय व्यक्तींना गमावलं आहे.

याच पार्शवभूमीवर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि मुंबई विद्यापीठापाठोपाठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं फी कपातीचा निर्णय जाहीर केला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांना फी कपातीसंदर्भात आवाहन केलं होतं.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं कोरोना विषाणू संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांनी त्यांची आई किंवा वडील या दोघांपैकी आणि दोन्ही पालक गमावले आहेत त्यांना 100 टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या या निर्णयामुळं विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं फी सवलत देण्याचा घेतलेला निर्णय फक्त 2020-21 या वर्षासाठी लागू असणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांना देखील हा निर्णय लागू असणार आहे.

हॉस्टेलची फी ज्यावेळी विद्यार्थी महाविद्यालयात येतील त्यावेशी महाविद्यालयांनी फी आकारावी, असं सांगण्यात आलंय. सावित्रीबीई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनं यंदाच्य शैक्षणिक वर्षासाठी फी कपातीचा निर्णय घेतला आहे. ग्रंथालय फी, प्रयोगशाळा फी, जिमखाना फी, एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिविटी,

कॉम्प्युटर फॅसिलिटी फीमध्ये 50 टक्के कपात करण्यात आलीय. तर, विद्यार्थी कल्याण फीमध्ये 75 टक्के कपात करण्यात आलीय. परीक्षा फी, विकास निधीमध्ये 25 टक्के कपात करण्यात आलीय.

तर, औद्योगिक भेट, महाविद्यालय वार्षिक नियतकालिक फी, प्रयोगशाळा अनामत, सी. एम. डिपॉझिट, इतर फी, आरोग्य तपासणी फी, आपत्ती व्यवस्थापन फी आणि अश्वमेध फीमध्ये 100 टक्के कपात करण्यात आलीय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe