अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
यासंदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.

तसेच, इयत्ता नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि सर्व संबंधित घटकांशी संवाद साधला. तेव्हा बोलताना गायकवाड म्हणाल्या,
करोना संक्रमणाची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय शिक्षण विभागाने मधल्या काळात ऑनलाइन, ऑफलाइन, यूट्यूब, गुगल या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले.
१ ली ते ४ थीच्या शाळा आपण संपूर्ण वर्षभर सुरु करू शकलो नाही. ५ वी ते ८ वीच्या शाळा काही ठिकाणी सुरू झाल्या,
तर काही ठिकाणी नाही. जेथे शाळा सुरू झाल्या तेथेही अभ्यासक्रम पूर्ण करता आले नाही. असे त्या म्हणाल्या.
त्यामुळे या विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षी वर्गोन्नती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे”, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|













