मोठी बातमी : ‘अनिल देशमुखांचे जावई आणि वकिल सीबीआयच्या ताब्यात !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- ‘अनिल देशमुखांचे जावई आणि वकिल सीबीआयच्या ताब्यात ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकिल आनंद डागा यांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. वरळीतल्या सुखदा इमारतीतून बाहेर पडत असताना गौरव चतुर्वेदी यांना ताब्यात घेण्यात आलं.

एकूण 10 जणांच्या पथकाने ही कारवाई केल्याचं कळतंय. याआधी अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यासमोरच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीन चीट दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. या बातम्या सीबीआयच्या एका रिपोर्टच्या आधारे प्रसारित झाल्या होत्या.

हा रिपोर्ट बाहेर गेला कसा याबाबत सीबीआय तपास करत असल्याची माहिती मिळतेय. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांना आतापर्यंत पाचवेळा चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. पण एकदाही अऩिल देशमुख चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याव दबाव वाढवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News