अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- 100 कोटी वसुली प्रकरणी अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनायल म्हणजेच ईडीनं समन्स बजावला आहे.
तसंच त्यांचा मुलगा ऋृषीकेश आणि पत्नीला देखील समन्स बजावला आहे. दरम्यान या समन्सनुसार अनिल देशमुख यांना आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखांना ई़डीने चौकशीसाठी आज सकाळी 11 वाजता मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत.
तिसऱ्या समन्सनंतरही अनिल देशमुख हे ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत. 30 जुलैला ईडीनं अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश आणि पत्नीला देखील समन्स बजावलं. असून चौकशीला हजर न राहिल्यास ईडी कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मात्र, देशमुख कुटुंबीय अजूनीही नॉट रिचेबल आहे. त्यामुळे सोमवारी अनिल देशमुख ईडीच्या चौकशीला हजर राहणार की नाही, हे पाहावे लागणार आहे.
तसेचं अनिल देशमुखांविरोधातल्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं सर्वांत मोठी छापेमारी मोहिम राबवली आहे. अनिल देशमुखांविरोधात असलेल्या वसुली आणि भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई सीबीआय मार्फत करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम