अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) त्यांची पुण्यातील
कार्यालये व घरावर छापे टाकत त्यांचे पुत्र अमित भोसले यांना फेब्रुवारी महिन्यात पुण्यातून ताब्यात घेऊन मुंबईत आणले होते.
बिलार्ड पिअर येथील कार्यालयात त्यांच्याकडे चौकशी सुरू होती. आज ईडीने परकीय चलन नियमन कायद (फेमा) १९९९ अंतर्गत भोसले यांची पुणे आणि नागपूरमधील ४०.३४ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
अमित भोसले हे महाविकास आघाडी सरकारमधील कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे मेहुणे आहेत. अविनाश भोसले व त्यांचे कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपासून ‘ईडी’च्या रडारवर आहेत.
परदेशात मालमत्ता खरेदी प्रकरणी त्यांच्यासह पत्नी गौरी भोसले यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या पुण्यातील घरी व कार्यालयावर छापेमारी सुरू होती.
ईडीने १० फेब्रुवारी रोजी बजावलेले समन्स व परकीय चलन नियमन कायद (फेमा) अंतर्गत नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले व त्यांचा मुलगा अमित भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
40 कोटी रुपयांचा मालमत्तेमध्ये क्लासिक सिटी इन्वेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या शेअर्स आणि इक्विटी बाँडचा ही समावेश आहे. 2017 मध्ये ईडीला अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दुबईमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी केली असल्याची माहिती मिळाली होती.
त्याच आधारे फेमा कायद्यांतर्गत कारवाई करून अविनाश भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि चौकशी सुरू करण्यात आली होती.
त्या चौकटीतच रोचडेल असोसिएट लिमिटेड दुबई कंपनीच्या मालकीच्या असलेल्या सुमारे 40 कोटी रुपयांच्या मालमत्तांमध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांची गुंतवणूक होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम