मोठी बातमी : उद्यापासून फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम बंद होणार ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  देशात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्या म्हणजेच फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामसमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने देशात काम करत असलेल्या सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यासाठी तीन महिन्यांची वेळही दिली होती.जी मुदत उद्या 26 मे रोजी पूर्ण होणार आहे.

आतापर्यंत या कंपन्यांनी सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन केलेलं नाही. त्यामुळे आता फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम हे तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भारतात उद्यापासून बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 25 फेब्रुवारी, 2021 रोजी सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना नव्या नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. सोशल मीडिया कंपन्यांना भारतात, कंप्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते

आणि त्या सर्वांचे कार्यक्षेत्र भारतात असणे अनिवार्य केले होते. यात, तक्रार निवारण, आक्षेपार्ह कंटेटवर लक्ष ठेवणे, कंप्लायंस रिपोर्ट आणि आक्षेपार्ह कंटेंट हटविणे आदी नियम आहेत.

25 फेब्रुवारी 2021 रोजी भारत सरकारच्या MEITY ने सर्व सोशल कंपन्यांना नवीन नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिने दिले होते. यामध्ये भारतात आपला अधिकारी आणि कॉंटेक्स अॅड्रेस देणे, अनुपालन (कम्प्लायन्स) अधिकाऱ्यांची नेमणूक, तक्रारीचे निवारण,

आक्षेपार्ह कंटेंटचे निरीक्षण करणे, अनुपालन अहवाल आणि आक्षेपार्ह कंटेंट काढून टाकणे अशा नियमांचा समावेश आहे. आतापर्यंत कू नावाच्या कंपनीशिवाय इतर कोणत्याही कंपनीने या अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली नाही.

सोशल मीडियावरील पीडित युझर्सना कुणाकडे तक्रार करावी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण कोठे होईल, यासंदर्भात माहिती नाही. काही प्लॅटफॉर्मने यासाठी सहा महिन्यांची मुदत मागीतली होती. काहींनी म्हटले आहे, की ते अमेरिकेतील त्यांच्या मुख्यालयाकडून आदेशाची वाट पाहत आहेत.

या कंपन्या भारतात काम करत आहेत. भारतात पैसा कमवत आहे. मात्र, गाइडलाइन्सचे पालन करण्यासाठी मुख्य कार्यालयच्या हिरव्या झेंड्याची प्रतिक्षा करत आहे. ट्विटरसारख्या कंपन्या स्वतःचे फॅक्ट चेकर नियुक्त करतात. मात्र, त्या त्यांची ना ओळख सांगतात, ना कशा प्रकारे तथ्य शोधले जाते, हे सांगतात.

मात्र, अद्याप कुठल्याही कंपनीने या नियमांचे पालन केलेले नाही. त्यामुळे, 26 मेनंतर भारतात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मिडिया साइट्स बंद होतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe