अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- पुणे शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच जात आहे.बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मागील सात दिवसांत सक्रीय बाधितांच्या संख्येत तब्बल एक हजाराने वाढ झाली आहे. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आज पुण्यात कोरोना नियंत्रण आढावा बैठक घेण्यात आली. दरम्यान, या बैठकीत २८ तारखेपर्यंत पुण्यातील शाळा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल हॉल मध्ये कोरोना नियंत्रण आढावा बैठक झाली. यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात २८ तारखेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर रिव्ह्यू घेऊन शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय होईल. लग्न समारंभासाठी केवळ २०० जणांची मर्यादा घालण्यात आली आहे. हॉटेल्स ११ वाजेपर्यंत सुरू त्यानंतर बंद ठेवण्यात येणार आहेत.तसेच रात्री ११ ते सकाळी सहा संचार बंदी लागू करण्यात येणार आहे.
सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन :- ज्या भागात रुग्ण अधिक वाढत आहेत, अशा ‘हॉटस्पॉट’ प्रभावी नियोजन करून आवश्यकता भासल्यास पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रे निर्माण करावेत अशा सूचना पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आज झालेल्या बैठकीत केल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघर भेटी देऊन सुपर स्प्रेडर, आयएलआय व सारी रुग्णांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या ताप सदृश्य रुग्णांची स्वाब तपासणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपर्क शोध मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना पवार यांनी केल्या. यासोबतच सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पवार यांनी बैठकीमध्ये केले.
नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे :- “पुणे शहर आणि जिल्ह्यात वाढत्या करोना रुग्णांची संख्या लक्षात घेता. नागरिकांच्या अधिकाधिक तपासण्या करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यानुसार तालुकानिहाय कोविड सेंटर उभारले होते. ते आता पुन्हा कार्यान्वित केले जातील आणि आपल्या शहराचा विचार करायचा झाल्यास भविष्यात रुग्ण संख्या वाढल्यास जम्बो कोविड सेंटर सुरू केले जाईल, पण नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे,” असं आवाहन आयुक्तांनी महापौरांना केलं आहे.
ग्रामीण भागांत कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात येणार ! :- विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत सांगितले की, सध्या एनआयव्हीमध्ये चाचण्या बंद आहेत. जीनोम सिक्वेन्सींग सुरू असल्याने चाचण्या बंद आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागांत कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. लग्न तसेच खासगी, राजकीय ,कार्यक्रमांवर निर्बंध. २०० लोकांच्या उपस्थितीस परवानगी असेल.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved