मोठी बातमी : शाळेची घंटा लवकरच वाजणार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- शिक्षण विभागाने लवकरच शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ऑगस्टमध्ये ब्रेक द चेन अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारने शिक्षण विभागाला दिले आहेत.

याबाबत शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. याअंतर्गत हॉटेल्स, दुकानांची वेळ वाढवण्यात आली आहे. आता पुढच्या टप्यात शाळा सुरु करण्याबाबत विचार सुरु आहे.

टास्क फोर्सबरोबर झालेल्या बैठकीत शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय शिक्षण विभागावर सोपवण्यात आला होता. यानंतर आता शिक्षण विभागाकडून चाचपणी सुरु करण्यात आलेली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या संदर्भात अधिकाऱ्यांशी पुढील आठवड्यात बैठक होणार आहे.

कोरोना संख्या कमी असलेल्या भागात सध्या ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे.

या सूत्रांनी सांगितले की, सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. पण ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी आणि शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. योग्य पद्धतीने शिक्षण होऊ शकत नाही. त्यामुळेच प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याच्या मानसिकतेत शिक्षण विभाग आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe