अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- अभिनेत्री शिल्पा शेट्टी या दिवसांत अडचणींचा सामना करत आहेत. तिचा पती राज कुंद्रा अश्लीलतेच्या प्रकरणात अडकलेला आहे.
बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे स्टार्स या संदर्भात आपली मते मांडत आहेत. गहना वशिष्ठने राज आणि शिल्पाला सपोर्ट केला आहे. तर दुसरीकडे पूनम पांडे यांनी कुंद्रावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान अभिनेता आणि मुलांचे शक्तिमान म्हणून प्रसिद्ध असणारे मुकेश खन्ना यांनी एक मोठे विधान केले आहे.
ते म्हणाले की राज कुंद्राच्या बाबतीत कलाकारांना माहिती असेलच. ते म्हणाले की शिल्पा शेट्टींला काही माहित असेल तर त्यांनी सत्य सांगावे. मुकेश खन्ना म्हणाले की, मीडियाला जेवढे दाखवले जाते तितकेच जनतेला माहित आहे.
एकेकाळी रेडिओ सांगायचं आता चॅनेल आणि वर्तमानपत्रे सांगतात. ते म्हणाले की ही बाब उघडकीस आली याचा मला आनंद आहे.
राज आणि शिल्पा यास जबाबदार आहेत की नाही हे मला माहिती नाही. पण सुशांत खून प्रकरणात ज्या पद्धतीने ड्रग अँगल चर्चेत आला तसेच खुलासे यात होतील. मला पती-पत्नीमध्ये बोलण्याचा अधिकार नाही. त्यांचे नाते काय आहे ते मला माहित नाही.
मी म्हटलं होत की आमची इंडस्ट्री हॉलीवूडला फॉलो करते. तेथे विवाह कमी आणि घटस्फोट जास्त आहेत. ते म्हणाले की राज कुंद्राचा एकच व्यवसाय नाही.
तो आयपीएल क्रिकेट संघाचा मालक आहे. ज्यामध्ये शिल्पा स्वतः जाते. मॅच फिक्सिंग प्रकरणात कुंद्राचे नाव समोर आले आहे.
तेव्हा अभिनेत्री तिच्या नवऱ्यांशी खूप इन्व्हॉल्व होती. मग तिच्यापासून ही गोष्ट कशी लपून राहील ? ते म्हणाले की शिल्पा शेट्टी जर खरी असेल तर तिने आपल्या पतीच्या विरोधात बोलले पाहिजे.
मुकेश खन्ना म्हणाले, ‘तुम्हाला साफ सुथरी फिल्म बनवायची नसेल तर आपण दो बीघा जमीन, आन आणि तमससारखे चित्रपट बनवू शकता. चित्रपट बनवण्याचे अनेक प्रकार आहेत. आपल्यातील कोणीही साधू नाहीत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम