शरद पवार व अमित शहा यांच्या भेटीवर आमदार रोहित पवारांचे मोठे विधान

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांपूर्वी ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीच्या चर्चा रंगल्या होत्या.

यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते. या भेटीवर अनेक राजकीय नेत्यांनी विधाने देखील केली होती. आता याच भेटीच्या मुद्द्यावरून कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मोठे विधान केले आहे.

पवार म्हणाले कि, शरद पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये भेट झालीच नाही. दरम्यान रोहित पवार हे कर्जत येथे आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. अमित शहा व शरद पवार यांची भेट झाल्याची जोरदार चर्चा आहे.

यावर आमदार पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले कि, ‘दिल्लीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते सामाजिक प्रश्नावर एकमेकांना भेटत असतात. अशा भेटी नियमित होत असतात. ज्यामध्ये वेगळे असे काही नाही.

परंतु भारतीय जनता पक्षाला यामधून वेगळे राजकारण करायचे दिसून येत आहे. पवार साहेबांची भेट झाली नाही, अशी माहिती पक्षाच्या अनेक नेत्यांनी दिलेली आहे. त्यामुळे मलाही वाटते की भेट झालेली नाही. यामुळे भाजपने वेगळी चर्चा या ठिकाणी करू नये.’

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!