अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- दूध व्यवसायामुळे तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली असून कोरोना संकटातील लॉकडाऊन मध्येही एक दिवस बंद न ठेवता राजहंस संघाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला.
नव्याने उभारलेला दूध पावडर प्लांट हा संकट काळात मोठा आधार ठरले असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे नवीन बॉयलर व अॉटो कन्व्हेअर उद््घाटन प्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख होते. ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, उपाध्यक्ष साहेबराव गडाख, गणपतराव सांगळे, संचालक लक्ष्मणराव कुटे, आर. बी. रहाणे, मोहनराव करंजकर, विलासराव वर्पे, डॉ. गंगाधर चव्हाण, बाबासाहेब गायकर, विलास कवडे, संतोष मांडेकर,
अण्णासाहेब राहिंज, पांडुरंग सागर, माणिक यादव, राजेंद्र चकोर, सुभाष आहेर, सुभाष गुंजाळ, कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे, फायनान्स मॅनेजर जी. एस. शिंदे आदी यावेळी मंचावर उपस्थित होते.
दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख म्हणाले, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस संघाची गौरवास्पद वाटचाल सुरू असून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आर्थिक शिस्त व काटकसर या तत्वांवर दूध संघाचा कार्यभार सुरू आहे.
राजहंस दूध संघाचा पावडर प्लांटचा निर्णय मोठा दिशादर्शक ठरला आहे. अॉटो कन्वेयर व नव्या बॉयलरमुळे दूध संघाच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. या पुढील काळात ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने काम केले जाईल, असेही ते म्हणाले.
यावेळी विनायक वैद्य, रमेश कोळगे, बाळासाहेब बडे, शरद केकान, भाऊसाहेब आहेर, सुरेश जोंधळे आदी उपस्थित होते. केले सूत्रसंचालन अॅड. सुरेश जोंधळे व नामदेव कहांडळ यांनी केले. उपाध्यक्ष साहेबराव गडाख यांनी आभार मानले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम