अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे सावट कायम आहे. यातच जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत गंभीर बनली असल्याने जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले.
मात्र आता खुद्द सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना नियमांचा विसर पडला असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. म्हणून सध्या शहरात वाढदिवस पार्ट्या जोरदार रंगू लागल्या आहेत.
करोनाच्या गंभीर परिस्थितीत कार्यालयात वाढदिवस साजरा केल्यामुळे महापालिका प्रशासनाने काही अधिकार्यांसह कर्मचार्यांना नोटिसा काढल्याचे प्रकरण ताजे असताना
पुन्हा मुकुंदनगर आरोग्य केंद्रातील एका महिला कर्मचार्याचा वाढदिवस करोना नियमांना हरताळ फासत धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी ही बाब उघडकीस आणली आहे.
महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांचा वाढदिवस चार दिवसांपूर्वी कार्यालयात धुमधडाक्यात साजरा झाला होता. गाण्याची मैफिल जमवत सेलिब्रेशन झालेला हा वाढदिवस वादाच्या भोवर्यात सापडला. महापालिका प्रशासनाने आरोग्य अधिकारी बोरगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
मुकुंदनगरमधील लसीकरण केंद्रात एका महिला कर्मचार्याचा वाढदिवस साजरा होत असल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यासंदर्भात नितीन भुतारे हे महापालिका आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत. आयुक्त त्यावर काय कारवाई करणार याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम