राहुरीत लसीकरण प्रकियेत अनेक अडचणी, भाजपचा आरोप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- राहुरी तालुक्यात नागरिकांना लसीकरण प्रक्रियेत अनेक अडचणी येत असून ऑनलाईन नोंदणी मध्ये तालुक्या बाहेरील नागरिक येथे येऊन लस घेऊन जातात.

मात्र येथील नागरिक लसीची प्रतीक्षा करत असतात. त्यामुळे याबाबत असलेल्या अडचणी दूर कराव्यात. अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्याकडे केली आहे.

तहसीलदार यांना निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्याप लसीकरण प्रक्रिया सुरळीत झालेली नाही.

ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमुळे तालुक्याच्या बाहेरील नागरिक राहुरीत येऊन लस घेत आहेत. मात्र स्थानिक नागरिकांना लसीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

त्यातच आता लस घेण्यासाठी कोविड चाचणी करणे अनिवार्य करण्यात आल्याने नागरिकांची लस घेण्याची मानसिकता दिसत नाही. या अटीबाबत शिथिलता करावी.

लसीकरण केंद्रांवर होणारी अनावश्यक गर्दी कमी करावी. राहुरी शहरात तालुक्याप्रमाणे बुथ निहाय लसीकरण सुरू करावे.

प्रथम डोस घेतलेल्या नागरिकांना प्राधान्य द्यावे. अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राहुरी तालुका भाजपा अध्यक्ष अमोल भनगडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, युवा शहराध्यक्ष गणेश खैरे, मा. युवा शहराध्यक्ष अजित डावखर आदी उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe