भाजपत नैराश्याचे वातावरण ! अनेकजण महाविकास आघाडीत येण्यास तयार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- भाजपत नैराश्याचे वातावरण असून भाजपमधील अनेकजण महाविकास आघाडीत येण्यास तयार आहेत. महाविकास आघाडीत आलेले भविष्यात भावी सहकारी होऊ शकतील, असे सुचक वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

नगर येथे शासकीय इमारतीची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर मंत्री थोरात बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, अशोक भांगरे आदी उपस्थित होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने दोनवर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत असून आगामी तीन वर्षेही आमचे सरकार निश्चितपणे पूर्ण करणार आहे.

भारतीय जनता पक्षामध्ये नैराश्य आलेले असल्याने महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ज्यावेळी ते येतील त्यावेळी ते भावी सहकारी होतात. राज्यात अतिवृष्टी झाळी असून अजून पंचनामे होणे बाकी आहे.

पाथर्डी, शेवगाव दोन तालुक्यांत मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे नुकसान झालेले आहे. याबाबत लवकरच कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे.

तसेच जीएसटीचा परतावा वेळेत मिळायला हवा, आज महाराष्ट्रात राज्य चालवताना कोट्यवधी कर्ज काढतो, पण दुसरीकडे आमच्या हक्काच्या जीएसटीचा परतावा केंद्र सरकारकडे अडकलेला आहे. तो सुमारे ३० ते ४० हजार कोटींचा आहे. याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe