भाजपने पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं, आता शिवसेनेची ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra news : विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे.

भाजपकडून बुधवारी विधानपरिषद निवडणुकीसाठीच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांचे नाव नाही. हा पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांसाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याचं आमंत्रण दिलं आहे. पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या तर आम्हाला आनंद होईल, त्यांचं स्वागतच करु.

भाजप मुंडे परिवाराला जी वागणूक देत आहे, ते दु:खद, असे खोतकर यांनी म्हटले आहे.विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले पाच उमेदवार जाहीर केले, यामध्ये प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र पंकजा मुंडे यांना यातून डावलण्यात आले आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe