अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांची लसीकरण केंद्रावर धावाधाव होत असल्याची दिसून येत आहे. यातच शहरातील महापालिकेच्या प्रोफेसर चौकातील लसीकरण केंद्रावर वाद झाला.
यामध्ये भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांना धक्काबुक्की करत असल्याचे दिसते. मात्र गंधे यांनी या घटनेचा इन्कार केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी महानगरपालिकेच्या सावेडी लसीकरण केंद्रावर भाजप पदाधिकारी आणि लसीकरणसाठी उपस्थित नागरिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा महापालिकेचे नगरसेवक भय्या गंधे व त्यांच्या मुलांना धक्काबुक्की करत मारहाण झाल्याचे समजते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
घटनेनंतर सावेडी केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. लसीकरणातील वशिलेबाजीवरून हा प्रकार घडल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. दरम्यान मनपाच्या प्रोफेसर कॉलनी चौकातील लसीकरण केंद्रावर शुक्रवारी कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध होते.
एका खासगी कंपनीतील कर्मचार्यांचे लसीकरण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्यांना लसीकरण केंद्रावर घेवून आले होते.लसीकरणावरून त्यांच्यात प्रथम वादावादी झाली व त्यांनतर त्यांच्यात हाणामारी झाली असल्याची माहिती समजली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम