भाजप सरकार केवळ व्यापारी व उद्योजकांचे सरकार ! कष्टकरी, गोरगरीब जनतेसह शेतकऱ्यांना त्रास

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- भाजप शासनाच्या काळात कष्टकरी, गोरगरीब जनतेसह शेतकऱ्यांना राज्यात खूप त्रास सहन करावा लागला. कॉँग्रेस राष्ट्रवादीने शेतकऱ्यांसाठी केलेले अनेक कायदे भाजप सरकारने रद्द केले.

याऊलट महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर महात्मा फुले शेतकरी सन्मान याजेनेअंतर्गत १९ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली असल्याचे प्रतिपादन कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले आहे.

ते श्रीरामपुरात शनिवारी आमदार लहू कानडे यांच्या यशोधन सभागृहात शहर कॉँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नेमणूक पत्र देताना बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार लहू कानडे, राष्ट्रीय सरचिटणीस हेमंत ओगले, उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जेष्ठे नेते ज्ञानदेव वाफारे, अरुण नाईक, इंद्रनाथ थोरात, सचिन गुजर, संजय छल्लारे, स्नेहलता कुलथे, श्रीनिवास बिहाणी, सुमैय्या शेख, रमण मुथ्था, रमेश कोठारी, ज्ञानेश्वर मुरकुटे, राजेंद्र पाऊलबुद्धे, मुज्जफर शेख आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री कदम म्हणाले, राज्यात काही कालावधीसाठी दुर्देवाने भाजपा सरकार आले. गोरगरीबांसाठी व शेतकऱ्यांसाठी लोकशाही आघाडी सराकारने केलेले अनेक कायदे रदद् केले. नोटबंदी व जीएसटीमुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली.

भाजप सरकार केवळ व्यापारी व उद्योजकांचे सरकार असल्याचा पुर्नरुच्चार त्यांनी केला. नूतन कार्यकारिणीत सर्वांना स्थान देण्यात आल्याचे ते म्हणाले. स्व. जयंत ससाणे यांच्या कार्यपद्धतीचे भरभरून कौतूक करीत श्रीरामपुरात काँग्रेसचा आमदार निवडून येणे ही स्व. ससाणे यांची पुण्याई असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपनगराध्यक्ष करण ससाणे हे आपले छोटे बंधू असून आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. जिल्ह्याने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रूपाने महाराष्ट्राला राज्यपातळीवर नेतृत्व दिले असुन आपल्याला सर्वांना ते बळकट करायचे असल्याचे मंत्री कदम यांनी सांगितले.

प्रास्ताविकात आमदार लहू कानडे म्हणाले, श्रीरामपूर मतदारसंघात आपण अनेक विकास कामे केले असून यासाठी राज्यमंत्री कदम यांनी आपल्याला विशेष सहकार्य केले. यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. समीन बागवान यांनी केले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe