अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- भारतीय जनता पार्टीच्या काळातील एक महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. मात्र आता याच कामाबाबत एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून केलेल्या कामांची विशेष तपास समितीकडून खुली चौकशी आज करण्यात आली आहे.
भाजप सरकारच्या काळात राबविण्यात आलेली ही योजना महाविकास आघाडीच्या सरकारने बंद केली आहे. भाजप सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजनेवर 9 हजार 634 कोटी रुपये खर्च करूनही पाण्याची गरज भागवण्यात व भूजल पातळी वाढवण्यात अपयश आल्याचा गंभीर ठपका कॅगने ठेवला होता.
हे अभियान राबवलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यात अपयश आल्याचा निष्कर्षही काढण्यात आला. हे अभियान राबवलेल्या गावात पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी टँकर्स सुरू असल्याचे कॅगने निदर्शनास आणून दिले होते.
त्यावेळी या अहवालावर मोठी चर्चा झाली. राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत चौकशीची घोषणा केली. दरम्यान जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत 2015-16 ते 2018-19 या काळाता 38 हजार 127 कामे झाली असून त्यावर 673 कोटी 16 लाखांचा खर्च झालेला आहेत. या कामांबाबत 74 तक्रारी झाल्या होत्या.
यातील 10 तक्रारी या जलसंधारण विभाग आणि जिल्हा परिषदेकडील कामाबाबत होत्या. उर्वरित तक्रारी या कृषी विभागाकडील कामांबाबत असून 50 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर 14 तक्रारांची चौकशी प्रगतीपथावर असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
जलयुक्तच्या कामाच्या चौकशीसाठी येणारी समिती जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयात थांबून लोकांच्या तक्रारीही ऐकून घेणार आहेत. त्यानंतर नेमकी कोणत्या कामांची सखोल चौकशी करायची, याची शिफारस ही समिती राज्य सरकारला करणार आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|