अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या दुसर्या लाटेत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले.
या शिबीरात युवकांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले. छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करुन या रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, डॉ. विजय जाधव, पै. अनिल डोंगरे, प्रतिष्ठानचे पिंटू जाधव, जालिंदर आतकर, अजय ठाणगे, प्रमोद जाधव, अंकुश आतकर, भरत फलके, डॉ. वसंतराव झेंडे,
डॉ. विलास मढीकर, मनिषा जोशी, योगिता देशमुख, सुलभा पवळ, चंद्रकला फंड, किशोर यादव, संजय पुंड, मयुर काळे, अक्षय पवार, अतुल डोंगरे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, राज्यापुढे कोरोनाचे संकट असताना रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेऊन राबविलेले रक्तदान शिबीर प्रेरणादायी आहे.
कोरोनाच्या संकट काळात सर्वांनी नैतिक जबाबदारी म्हणून प्रशासनाला सहकार्य करण्याची व नियम पाळण्याची गरज आहे.
कोरोनाशी लढा देताना संभाजी महाराजांचे स्मरण करुन बळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पिंटू जाधव यांनी रक्त कोणत्याही पध्दतीने कृत्रिमरित्या तयार होत नाही.
संकटकाळात माणुसकीच्या भावनेने एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे. रक्तदान मोहीम व्यापक होणे गरजेची आहे.
कोरोनाच्या संकटकाळानंतर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर रक्तही मनुष्याच्या जीवनासाठी अत्यावश्यक बाब बनली असून, गरजू रुग्णांना जीवदान देण्यासाठी रक्तदानासाठी युवकांना पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
रक्तदात्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. संकटकाळात गावातील युवकांनी उत्सफुर्तपणे केलेल्या रक्तदानाबद्दल डॉ. विलास मढीकर यांनी आभार मानले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|