अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- आतापर्यंत दोन वेळा दिलेली मुदवाढ संपुष्टात आल्याने अखेर येथील भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे.
दि.१० फेब्रुवारी २०२० रोजी भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यानंतर निवडणूकीसाठी नव्याने वॉर्ड रचना करून आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती.
मात्र याच दरम्यान कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आल्याने ती निवडणूक होऊ शकली नाही. मात्र कोरोनामुळे मुदत संपलेल्या त्या सदस्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली.
ऑगस्टमध्ये परत दुसऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली. ती मुदत दि.१०फेब्रुवारी २०२१ रोजी ती मुद्दतदेखील संपली. कॅन्टोन्मेंटच्या कायद्यातील तरतुदीनुसार तिसऱ्यांदा बॉडीला मुदतवाढ दिली जात नाही.
त्यामुळे बोर्ड बरखास्त होऊन बोर्डाच्या कारभार हा अध्यक्ष ब्रिगेडियर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या समितीकडे जातो. या कायद्यामुळे आता भिंगारचा कारभार या दोघांच्या समितीकडे असणार आहे ही समिती बोर्ड संबंधीचे निर्णय घेणार आहेत. आता अहमदनगरसह पुणे, खडकी,
देहूरोड आदीसह राज्यातील सात व देशातील एकूण ५६ कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कार्यकाळ संपल्यामुळे बोर्ड बरखास्त करण्यात आली आहे. आता पुढील निवडणूक होईपर्यंत ब्रिगेडियर आणि सीईओची समिती बोर्डाच्या कारभार पाहणार आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved