पोलिसांना टीप दिल्याचा राग आल्याने दोघांना बेदम मारहाण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे पाच जणांनी मिळून दोघा जणांना लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली. या दोघांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाला टिप देऊन छापा टाकायला लावला असल्याच्या कारणावरून हि मारहाण झाल्याचं समजते आहे.

याबाबत अंकित गोद आसावा (रा. सोनगाव ता. राहुरी) याने राहुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीवरून गिरन फकीरचंद तांबोळी, आदनान मिरन तांबोळी, पिरमोहंमद तांबोळी, सोनू उर्फ अरबाज पिरमोहंमद तांबोळी,

शैयाज पिरमोहंमद तांबोळी (सर्व रा. सात्रळ, ता. राहुरी) या पाच जणांवर जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अंकितने फिर्यादीत म्हटले, एके दिवशी आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी अंकित आसावा याला म्हणाले,

तुम्ही आमची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाला टिप दिली आणि छापा टाकायला लावला. असे म्हणून फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी व लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.

यामध्ये फिर्यादी अंकित गोद आसावा आणि योगेश अर्जुन गिते हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत.

अंकित आसावा याने पोलिसांत फिर्याद दाखल केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सोमनाथ जायभाय करीत आहेत.

या घटनेतील दोन आरोपी अटक केले असून बाकीचे पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe