अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचे हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आरोपी बाळ बोठेला अटक केली आहे. दरम्यान त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
बोठे याच्या पोलीस कोठडीची मुदत आज (शनिवार) संपत असल्याने त्याला पारनेर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचे हत्याकांडप्रकरणी बोठे याचे नाव आल्यानंतर तो 102 दिवसांपासून पसार होता.

त्याला पोलिसांनी हैदराबाद येथील बिलालनगर परिसरातून मोठ्या शिताफीने अटक केली. अटक केल्यानंतर त्याला पारनेर न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयाने 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
पोलीस कोठडीदरम्यान बोठेने घटनेचा उलगडा केला असला तरी आणखी तपास करणे बाकी असल्याने वाढीव कोठडीची मागणी पोलीस करणार आहे.
दरम्यान, पोलिसांनी शुक्रवारी बोठे याच्या समक्ष घराची झडती घेतली. त्याठिकाणी काही वस्तू हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|