अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेने कोरोना प्रादुर्भाव असलेल्या परिसरात कंटेनमेंट झोन सुरू केले आहेत. शहरातील तीन कंटेन्मेंट झोन
१) बोल्हेगाव गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी रस्त्याची पूर्व बाजू आदिकैलास-बी इमारत
२) राघवेंद्र स्वामी नगर परिसरातील संध्या जनरल स्टोअर्स ते उत्तरेकडील अपार्टमेंटपर्यंत
३) बोल्हेगाव मनोलिलानगर येथील डहाळे ज्वेलर्स ते भानुदास लोटके यांचे घर आज दुपारी दोन वाजल्यापासून ते 26 मार्चपर्यंत हा सूक्ष्म कंटेनमेंट झोन राहणार आहे. या कालावधीमध्ये या सूक्ष्म कंटेनमेंटमधील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहतील.
कंटेनमेंट झोनमधील अत्यावश्यक सेवेसाठी उपायुक्त यांच्या नेतृत्वाखाली पथक कार्यरत राहील. कंटेनमेंटमधील अत्यावश्यक सेवेसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येईल. रहदारीसाठी खुल्या असलेल्या मार्गावर येणाऱ्या-जाणाऱ्यांची तपासणी होईल.
कंटेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तू या महापालिकेतर्फे पुरवल्या जातील. त्यासाठी यंत्रणा उभी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|